LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कडोली येथे ४८.३४ लाखांच्या पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमीपूजन*

कडोली | प्रतिनिधी :
कर्नाटक सरकारच्या पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागांतर्गत तसेच नाबार्ड आरआयडीएफ-३० योजनेच्या माध्यमातून कडोली येथे नव्या पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीच्या बांधकामाचा भूमीपूजन समारंभ उत्साहात पार पडला.

या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

नाबार्ड आरआयडीएफ-३० योजनेअंतर्गत या इमारतीसाठी अंदाजे ४८.३४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, हा निधी पालकमंत्री व लोकोपयोग मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहे.

या नव्या इमारतीमुळे कडोलीसह परिसरातील शेतकरी व पशुपालकांना आधुनिक व दर्जेदार पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून, पशुसंवर्धन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमास केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण भागातील विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*