या कार्यक्रमास युवा नेते अमान सेठ, बुडा आयुक्त शकील अहमद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विविध ठिकाणी विधिवत पूजा-अर्चा करून विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.
या टप्प्यात रस्त्यांचे मजबुतीकरण, पावसाळी पाण्यासाठी नाले व स्टॉर्मवॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारणे, तसेच पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे रामतीर्थ नगर परिसरातील नागरी सुविधा अधिक सक्षम व दर्जेदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मत्स्य विभाग कार्यालय परिसर, माजी महापौर एन. बी. निरवाणी यांच्या निवासस्थानाजवळील भाग तसेच शिवशक्ती बदवाणे परिसरात विविध ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नागरिकांना संबोधित करताना आमदार आसिफ सैत यांनी सांगितले की, रामतीर्थ नगरचा ताबा बुडा कडून महानगरपालिकेकडे सुपूर्द होण्यापूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येतील. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास एन. बी. निरवाणी, सुरेश यादव, सुरेश उर्बिनट्टी, एम. एम. किट्टूर, दिलावर कांबर्गणवी, पुष्पा पर्वतराव यांच्यासह स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामतीर्थ नगरच्या विकासाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जात असून, आगामी काळात उर्वरित कामांनाही वेग मिळणार आहे.
Also read









