LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सुवर्णसौधमध्ये मंगळवारी बालविकास अ‍ॅकॅडमी पुरस्कार वितरण सोहळा*;

बेळगांव:कर्नाटकातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कर्नाटक बालविकास अ‍ॅकॅडमीतर्फे प्रथमच बेळगांव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये मंगळवार, 16 डिसेंबर रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 2022-23 आणि 2023-24 या दोन वर्षांतील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्यातील सुमारे 2 कोटी मुलांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रगतीसाठी अ‍ॅकॅडमी सातत्याने काम करत आहे, अशी माहिती अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष संगमेश बबलेश्वर यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली दुपारी 1 वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून राज्यातील 34 शैक्षणिक जिल्ह्यांमधून निवडलेले पुरस्कारार्थी सहभागी होणार आहेत.

या सोहळ्यात –अ‍ॅकॅडमी गौरव पुरस्कार,मुलांचे चंदिर पुस्तक पुरस्कार,बालगौरव पुरस्कार,विशेष गौरव पुरस्कार,यांचे वितरण करण्यात येणार आहे.

बालसाहित्य, रंगभूमी, क्रीडा, विज्ञान, चित्रकला, नृत्य, संगीत, सामाजिक कार्य, बालहक्क आणि बालमन विकास या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी मान्यवर व्यक्ती, संस्था आणि प्रतिभावान मुलांना सन्मानित केले जाणार आहे.

रोख पारितोषिके

अ‍ॅकॅडमी गौरव पुरस्कार – ₹25,000,मुलांचे चंदिर पुस्तक पुरस्कार – ₹15,000,बालगौरव पुरस्कार – ₹10,000,विशेष गौरव पुरस्कार – ₹10,000

गेल्या दोन वर्षांत संगमेश बबलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅकॅडमीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. धारवाड येथील मुख्यालयात 20 लाख रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आला असून, ‘मिशन विद्याकाशी’ अंतर्गत एसएसएलसी विद्यार्थ्यांच्या निकाल सुधारण्यासाठी या स्टुडिओचा वापर केला जाणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*