Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात दिव्यांग विक्रेत्याकडून अवैध भू-भाडे वसुली; आमदार सेठ व महापौर पवारांचा अधिकाऱ्यांना दणका*

बेळगाव : शहरातील मेणसे गल्ली परिसरात रस्त्यावर किरकोळ कपड्यांची विक्री करणाऱ्या एका दिव्यांग विक्रेत्याकडून महापालिकेच्या ठेकेदाराकडून अवैध पद्धतीने भू-भाडे वसूल केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर मंगळवारी महापालिकेत चांगलाच गदारोळ झाला. दिव्यांग व्यक्तीकडून वसुली करू नये, असा स्पष्ट आदेश असतानाही ही वसुली सुरू असल्याचे समोर आल्यानंतर आमदार आसिफ राजू सेठ, महापौर मंगेश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत जाब विचारला.

मारुती सिद्धप्पा कलीगार (वय 42) हा दिव्यांग विक्रेता गेल्या काही वर्षांपासून मेणसे गल्ली परिसरात कपड्यांची छोटी विक्री करतो. नियमाने दिव्यांग विक्रेत्यांकडून भू-भाडे आकारले जाऊ शकत नाही; मात्र ठेकेदाराने दररोज २० रुपये जबरदस्तीने वसूल केल्याची तक्रार मारुती यांनी केली. वसुली न दिल्यास जागेतून हाकलण्याची धमकीही देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या अन्यायाला कंटाळून मारुती यांनी थेट महापालिका कार्यालय गाठून स्वागत कक्षात बसून रडत आपली व्यथा मांडली. त्यांच्या अवस्थेची माहिती सभागृहातील बैठकीत पोहोचताच आमदार सेठ, महापौर पवार आणि आयुक्त कार्तिकी एम. यांनी तात्काळ बाहेर येऊन त्या दिव्यांगाची समजूत काढली व त्वरित मदतीचे आश्वासन दिले.

यानंतर झालेल्या बैठकीत आमदार व महापौर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारले की, “दिव्यांगांवर असा अन्याय होत असताना तुम्ही नेमके काय पाहता आहात? पोटासाठी दिवसभर बसणाऱ्या माणसाकडून पैसे घेतले तर तो काय कमावणार?” नगरसेवकांनीही ठेकेदाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

महापालिका आयुक्तांनी याची तात्काळ चौकशी सुरू करण्याचे आदेश देत ठेकेदारावर आवश्यक कारवाई होईल, असे सांगितले. तसेच पुढील निविदेमध्ये दिव्यांग विक्रेत्यांकडून भू-भाडे आकारण्यास स्पष्ट मनाई असणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*