LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने २०२५ -२६ "आदर्श मराठी शाळा पुरस्कार" जाहीर.*

*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने २०२५ -२६ "आदर्श मराठी शाळा पुरस्कार" जाहीर. तसेच उल्लेखनिक कामगिरी करणाऱ्या इतर तीन शाळांचा सुद्धा विशेष पुरस्कार देऊन होणार सन्मान*

मातृभाषेतून शिक्षण देत वेगवेगळे प्रयोग, उपक्रम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या बेळगाव आणि खानापूर भागातील मराठी शाळांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन *कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ "युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६" देऊन गौरव करण्यात येत आहे.*
यावर्षी या पुरस्कारासाठी २१ शाळांनी अर्ज केला होता त्यापैकी खालील पाच शाळांना सदर पुरस्कार देण्यात आले आहेत.
*1. सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हेमाडगा ता.खानापूर जि.बेळगाव*
*2. सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा विजयनगर, जांबोटी ता. खानापूर जि. बेळगाव*
*3. सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा देसूर ता.जि. बेळगाव*
*4. सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा हालगा, ता. जि.बेळगाव*
*5. सरकारी मराठी आदर्श शाळा हिंडलगा, ता. जि.बेळगाव*

या व्यतिरिक्त ज्या शाळा सर्वच बाबतीत परिपूर्ण आहेत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत शैक्षणिक यशाच्या शिखरावर आहेत आणि त्याहून अधिक प्रगती साधण्यासाठी धडपड करत आहेत. अशा शाळांना यावर्षीपासून "ज्ञानशिखर सन्मान" पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
यावर्षी खालील दोन शाळांना *"ज्ञानशिखर सन्मान"* पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
1. *सरकारी मॉडेल मराठी प्राथमिक शाळा, येळ्ळूर ता. जिल्हा बेळगाव*
2. *कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा कॅम्प बेळगाव.*

*विशेष "ज्ञानज्योती पुरस्कार-२०२६"*
मर्यादित संसाधने उपलब्ध असून देखील केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार शिक्षण देत अतिशय दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या

*"उच्च प्राथमिक मराठी शाळा जामगाव, ता.खानापूर, जिल्हा बेळगाव"*

या शाळेला विशेष *'ज्ञानज्योती पुरस्कार'* देऊन गौरव करण्यात येणार आहे.

सदर पुरस्काराचे वितरण *"मराठी भाषा गौरव दिनाचे"* औचित्य साधून रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे प्रसिद्ध मराठी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक *"श्री हेमंत ढोमे"* यांच्या हस्ते संपन्न होणार असून संबंधित शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शा.सु.समिती, आणि पालकवर्ग यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*