LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात ‘2 व्हिजन कर्नाटका मेगा एक्झिबिशन’ला प्रारंभ*

बेळगाव : डी मीडिया

प्रयास इव्हेंट अँड एक्झिबिशन, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘2 व्हिजन कर्नाटका मेगा एक्झिबिशन’ चे बेळगाव येथे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. हे तीन दिवसीय प्रदर्शन 23, 24 आणि 25 जून दरम्यान नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

बेळगावमध्ये या प्रदर्शनाचे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले असून, खासदार जगदीश शेट्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनमंत कोंगाली, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश  कवटगीमठ, मुर्गेंद्र गौडा पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, शिल्पा केकर, नागराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध मंत्रालयांशी संबंधित विभागांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. नागरिकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि सरकारी उपक्रमांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

विविध विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ या प्रदर्शनात सहभागी झाले असून, सामान्य नागरिकांना त्यांच्या उपयोगाच्या योजना समजावून सांगण्यात येणार आहेत.

प्रयास इव्हेंटचे संचालक मितू यांनी सांगितले की, “सरकारकडून नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बेळगावकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सरकारी योजनांची माहिती घ्यावी.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*