Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*॥ मार्कंडेय युवक संघाचा 55 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ॥*

॥ मार्कंडेय युवक संघाचा 55 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ॥
अध्यक्षानी दिला स्थापनेच्या आठवणीना उजाळा
कंग्राळी खुर्द - शैक्षणिक , सामाजिक , क्रिडा व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मार्कडेय युवक संघाचा 55 वा वर्धापन दिन मोठया उत्साहात , विविध नवे संकल्प डोळ्या समोर ठेवून साजरा करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष बी एन पूजारी यांनी संघ स्थापने वेळीच्या आठवणी व संघर्ष यांना उजाळा देऊन नवीन तरुणानी या संघाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले .

संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमांत प्रारंभी श्री मरगाणाईदेवी पूजन ग्राप सदस्य यशोधन तुळसकर व राकेश पाटील यांनी , श्री मातंगी देवी पूजन मा जवान सोमनाथ पाटील यांनी तर मंडळ फलख पूजन जवान अक्षय बेळगांवकर व ग्राप सदस्य वैजनाथ बेन्नाळकर यांनी केले . त्यानंतर उपस्थित तरुणांना प्रोत्साहित करतांना अध्यक्ष पूजारी व मार्कंडेय साखर कारखाना अध्यक्ष आरआय पाटील यांनी मार्गदर्शन करतांना संघाची स्थापना 55 वर्षापूर्वी अनेक अडचणीतून झाली असून कै. आ. बी आय पाटील , कै. एम आय पाटील , कै. के.एम पाटील , आर पी धामणेकर, संघाचे अध्यक्ष बी एन पुजारी सह त्यावेळच्या 50 पेक्षा जास्त तरुणांनी न डगमगता ग्राप चा विरोध झुगारून , संघर्ष करून स्थापना केली .

त्यानंतर संघाच्या माध्यमातून कब्बडी , खोखो , कुस्ती ,ॲथलेटीक व अलीकडे शरीरसौष्ठव मध्ये अनेक खेळाडू निर्माण केले हायस्कूल व व्यायाम शाळा स्थापना करून गावातील मुलांची शिक्षणाची व व्यायामाची सोय केली आहे . या संघाच्याच कार्याची ओळख सीमाभागात झालेले कै आम . बीआय पाटील यांना राजकीय आशिर्वाद मिळाला आणि ते राजकरणात सक्रिय झाले . त्यामुळे आता गावातील तरुणांनी या संघात सक्रिय सहभागी होऊन परंपरा सुरू ठेवावी असे आवाहन केले यावेळी संघाच्या व्यायाम शाळेत आता नवीन आधुनिक उपकरणे आणली जाणार असे ग्राप सदस्य प्रशांत पाटील यांनी सांगितले .

यावेळी वरील मान्यवरांसह जष्ठ सदस्य रमेश पाटील , बाबू पावशे,विष्णू मुतगेकर ,रणजित पाटील , प्रकाश पाटील, निखिल पाटील, प्रशांत देसाई, रवळनाथ यादव, प्रल्हाद पाटील, ज्योतिबा सर मनोहर पाटील , दर्शन पाटील , विशाल पाटील , मंजूनाथ पाटील सुशांत जाधव ओमकार पावशे,यांचेसह संघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . सूत्र संचालन किसन पाटील यांनी तर शेवटी आभार प्रकाश पाटील यांनी मानले .
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*