Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Sports News

बेळगाव डिस्टिक बॉडी बिल्डिंग असोसिएशनची पहिली वार्षिक सभा उत्साहात

बेळगाव : बेळगाव डिस्टिक बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा क्लब रोड येथील डॉ. संजय अण्णा सुंठकर यांच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत आगामी शरीरसौष्ठव स्पर्धांचे नियोजन, संघटनेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा आणि विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून दलित नेते मल्लेश चौगुले, विकास कलघटगी आणि डॉ. संजय सुंठकर उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते यांच्यासह अनिल अबरोळे, राजेश लोहार, नारायण चौगुले, भरत बाळेकुंद्री, सुनील चौधरी, चेतन तहसीलदार, विनोद मैत्री, प्रवीण कंबरकर, विजय चौगुले, बाबू पावशे, श्रीधर बारटक्के, दीपक कित्तूरकर, सोमनाथ हलगेकर, राजू पाटील, संतोष सुतार, आनंद आपटेकर, रोनक गवस, श्रीहरी बेळगावकर, संकेत सांब्रेकर, मोहन कंग्राळकर, उद्योगपती सुरेश तळवार, संदीप कोलकार आणि समाजसेवक गणेश दड्डीकर यांच्यासह अनेक व्यायामपटू उपस्थित होते.
23 सप्टेंबरला ‘जय गणेश श्री 2026’ स्पर्धा
या वार्षिक बैठकीत 23 सप्टेंबर 2026 रोजी ‘जय गणेश श्री 2026’ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्पर्धेमुळे बेळगाव जिल्ह्यातील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
‘जय गणेश श्री 2026’ किताब पटकावणाऱ्या विजेत्यास डॉ. संजय सुंठकर फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच चेतन तहसीलदार यांच्या फ्लेक्स जिमच्या वतीने विजेत्यास सायकल भेट देण्यात येणार आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘जय भीम क्लासिक कप’
बैठकीदरम्यान दलित नेते मल्लेश चौगुले यांनी आगामी नोव्हेंबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय ‘जय भीम क्लासिक कप’ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर केला.
वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेचा वार्षिक अहवालही वाचून दाखवण्यात आला. संघटनेच्या पुढील वाटचालीसंदर्भात विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी शरीरसौष्ठव आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात बेळगाव डिस्टिक बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व विविध विभागांचे उद्घाटन संपन्न**गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'बेळगावचा राजा' मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्त श्री भूषण बोरसे यांची भेट; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा*बेळगाव डिस्टिक बॉडी बिल्डिंग असोसिएशनची पहिली वार्षिक सभा उत्साहात*राहुल गांधींवरील FIRने बेळगावात काँग्रेस आक्रमक; भाजप-RSSविरोधात जोरदार आंदोलन**गणेशोत्सवापूर्वी बेळगावातील रस्ते खड्डेमुक्त करा लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी**अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आणि सामाजिक विचार युवा पिढीसाठी प्रेरणादायी : सतीश जारकीहोळी**बेक्किनकेरेच्या मराठी शाळेचा पुन्हा डंका! उचगाव केंद्र क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा ‘चॅम्पियन’**बेळगावातील BSNL नेटवर्क समस्येचा मुद्दा खासदार शेट्टरांकडे; केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन**बेळगाव ग्रामीणमध्ये मोठी विकासकामे; कुकरडोळीतील रस्त्यांसाठी ३ कोटींचा निधी**बेळगावच्या जलतरणपटूंचा जलवा! 21व्या आंतरराज्य स्पर्धेत 118 पदकांसह 13 वैयक्तिक विजेतेपदांवर मोहोर*