बेळगाव : शहरातील वॉर्ड क्रमांक 29 मधील हिंदवाडी स्थित घुमटमाळ मारुती मंदिर हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारे महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते. दररोज मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून मंदिर परिसरातील हायमास्ट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळेस अंधार पसरत होता. यामुळे भाविकांना आणि रहिवाशांना असुविधेला सामोरे जावे लागत होते.
या समस्येची गंभीर दखल घेत नगरसेवक नितीन जाधव यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधत हायमास्ट लाईटची दुरुस्ती करून घेऊन ते पुन्हा सुरु करण्यात यश मिळवले. प्रकाशयोजनेमुळे मंदिर परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण झाले असून नागरिक आणि भाविकांमध्ये याबाबत समाधानाची लाट आहे.
स्थानिकांनी नितीन जाधव यांच्या तत्पर कामाचे आणि सार्वजनिक सुविधांबाबत दाखवलेल्या सक्रीय भूमिकेचे कौतुक केले आहे. मंदिर परिसरातील उजेडामुळे पुन्हा एकदा धार्मिक वातावरण तेजाळून उठल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.