LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*हिंडलगा धावपटूंचे दुहेरी यश; रोटरी हाफ मॅरेथॉनमध्ये चमकदार विजय*

हिंडलगा धावपटूंचे दुहेरी यश; रोटरी हाफ मॅरेथॉनमध्ये चमकदार विजय

बेळगावातील रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या पुढाकाराने रविवारी पार पडलेल्या रोटरी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत हिंडलगा गावातील दोन धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य जनजागृती आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यासाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये विविध अंतर आणि वयोगटांत शेकडो धावपटूंनी सहभाग नोंदविला.

ज्येष्ठ वयोगटातील १० किमी धावण्याच्या स्पर्धेत हिंडलगाचे अनुभवी धावपटू सुरेश सांगावकर यांनी दमदार वेग आणि सहनशक्तीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. त्यांनी ६० वर्षांवरील गटात आपली सरस कामगिरी कायम राखत पुन्हा एकदा ऍथलेटिक्समधील आपला दबदबा सिद्ध केला. सांगावकर यांनी यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून त्यांचा अनुभव आजही तरुण धावपटूंना प्रेरणा देणारा आहे.

याच स्पर्धेत ५५ वर्षांवरील गटात निवृत्त सुभेदार मेजर, ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी प्रभावी धाव सादर करत रौप्य पदकाची कमाई केली. सैनिकी शिस्त आणि नियमित सराव यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय झेप घेतली.

दोन्ही खेळाडूंच्या या कामगिरीचे गावासह संपूर्ण परिसरात कौतुक केले जात असून, स्थानिक क्रीडाक्षेत्रासाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*