Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सायबर सुरक्षेचा धडा! मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य*

 

बेळगाव : डिजिटल युगात इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, बेळगाव आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (9 सप्टेंबर 2026) मराठी विद्यानिकेतन हायस्कूल, बेळगाव येथे जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानाचा एक भाग होता. ऑनलाइन जगतात वावरताना विद्यार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान सायबर वॉरियर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून ऑनलाइन जगतातील संभाव्य धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे मांडल्या. मनोरंजनासोबतच जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ऑनलाइन फसवणूक, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती शेअर करताना घ्यावयाची काळजी तसेच इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदार वापर यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून प्रकाश टाकला.

या उपक्रमाला प्राचार्य आनंद पाटील, वर्षा उचगावकर, सायबर वॉरियर्स क्लबच्या समन्वयक तसेच क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर (हायस्कूल), बी. जी. पाटील (प्राथमिक), शाळा प्रशासक सविता पवार आणि शिक्षण समन्वयक नीला आपटे यांचीही उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित, सजग आणि जबाबदार वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणारा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव विशेष वार्तांकन शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘मॉन्टी फाउंडेशन’चा निर्धार!* *मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देणे गरजेचे : अविनाश भोसले**महादान २०२६’ अंतर्गत रक्तदानासह अवयवदान, नेत्रदान व देहदान जनजागृती अभियान विनायक नगर येथे २० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन**सायबर सुरक्षेचा धडा! मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य**22 वी खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी; कर्नाटक-महाराष्ट्रात सुमारे 15 ठिकाणी झडती*देवन बामणेची विश्वविजयाकडे झेप!श्री गणेश फेस्टिव्हलचा आज सांगता सोहळा; बेळगावातील नवरत्नांचा होणार गौरव*अपघातात जखमी झालेल्या शांताताईंची प्रकृतीची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली विचारपूस**नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट; बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी**बेळगाव शहरासाठी १५० BSNL 4G टॉवर्सची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन*