LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*विजयनगर येथे बसस्थानकाचे लोकार्पण – मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन*

बेळगाव (प्रतिनिधी):
विजयनगर, हिंडलगा  परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. मंगला सुरेश अंगडी यांच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या नव्या बसस्थानकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमात बेळगाव भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी भाषण करताना सांगितले की, “हे बसस्थानक अनेक वर्षांपासून विजय नगरवासीयांचे स्वप्न होते. दिवंगत अजीत हळकर्णी व मितुन उसुंलकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज हे स्वप्न साकार झाले आहे. या स्थानकाचे उद्घाटन अजीत हळकर्णी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले असून, भाजप कार्यकर्त्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.”

या वेळी हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, लक्ष्मी पर्मेकर, मिथुन उसुंलकर, लता उसुंलकर, भाग्यश्री कोकितकर, अजीत हळकर्णी परिवार, विलास तहसीलदार यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

https://youtube.com/shorts/n1Q5ZBqEsrw?si=ISiEkWok1sIFGa6k

या बसस्थानकामुळे विजयनगर परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठी सुविधा मिळणार असून, वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी