राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगाव शहरात पथ संचलन आयोजित करण्यात आले होते. या पथ संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. सरदार हायस्कुल मैदानावरून पथ संचलनाला प्रारंभ झाला.पथ संचलनाच्या अग्रभागी वाहनावर संघ संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.
संचलनाच्या मार्गांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. भगव्या पताका आणि भगवे ध्वज देखील मार्गांवर लावण्यात आले होते. संचलन पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी वंदे मातरम, जय श्रीराम, भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. अनेक ठिकाणी युवक मंडळानी आणि नागरिकांनी स्वयंसेवकावर पुष्पवृष्टी केली. संचलनात सहभागी झालेले घोष पथक लोकांचे आकर्षण ठरले होते. शहरातील विविध मार्गांवर फिरून लिंगराज कॉलेज मैदानावर संचलनाची सांगता झाली.
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.