Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मुलगी जिवंत असतानाच श्राद्ध! रायबाग तालुक्यातील धक्कादायक घटना*

मुलींने प्रियकराच्या सोबत पलायन केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी मुलगी जिवंत असतानाच श्राद्ध घालून नातेवाईकांना जेवण घातल्याची धक्कादायक घटना
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली आहे.
सुश्मिता पाटील (१९) तरुणी आणि विठ्ठल बस्तवाडे (२९) यांचे एकमेकांवर प्रेम होते. गुरुवारी सुश्मिता आणि विठ्ठल हे दोघेही पळून गेले.मुलगी घरातून पळून गेल्याच्या घटनेने वडिलांना धक्का बसला. या घटनेमुळे दुःखी झालेल्या मुलीच्या वडिलांनी पळून गेलेल्या मुलीचे जिवंतपणी श्राद्ध घालून नातेवाईकांना घरी बोलवून बाराव्याचे जेवण घातले.भावपूर्ण श्रध्दांजली असा मजकूर लिहिलेला बॅनर देखील घराजवळ मुलीच्या वडिलांनी लावला आहे. याशिवाय मुलीच्या फोटोसमोर मृत व्यक्तीला नैवेद्य ठेवतात त्याप्रमाणे नैवेद्य ठेवला आहे.

सुश्मिता पाटील या तरुणीचे त्याच गावातील विठ्ठल बस्तवाडे या मुलावर प्रेम असल्याने, दोघे पळून गेले. विठ्ठल तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून काम करतो. सुष्मिताच्या वडिलांना चार मुली असून सर्वात लहान मुलगी सुष्मिता आहे. मुलगी पळून गेल्याने घराण्याच्या इभ्रतीला धक्का असल्याने वडीलांनी दुखी होऊन श्राद्ध घातले.
सुरुवातीला रायबाग पोलिस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दिली. त्यानंतर नातेवाईकांना पाहुण्यांना बोलावून मुलीचे फोटो पूजन करून जेवण घातले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*