LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

मुलीच्या शिक्षणासाठी आईची धडपड; आधार कार्डासाठी कारागृहाचे उंबरठे झिजले

बेळगाव | प्रतिनिधी
एका लहान मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले कागदपत्र मिळविण्यासाठी एका महिलेची सुरू असलेली संघर्षमय धडपड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गदग जिल्ह्यातील ही महिला आपल्या पतीचे आधार कार्ड मिळवण्यासाठी बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे उंबरठे झिजवत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने समाजाचा विरोध पत्करून आंतरधर्मीय विवाह केला होता. दाम्पत्याला दोन मुली झाल्या. मात्र कौटुंबिक वादातून मोठ्या मुलीच्या हत्येप्रकरणी पतीला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली असून तो सध्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या शालेय प्रवेशासाठी आणि आवश्यक शासकीय नोंदी पूर्ण करण्यासाठी वडिलांच्या आधार कार्डाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी संबंधित महिला गदगहून बेळगावला येऊन कारागृह प्रशासनाशी संपर्क साधत आहे. मात्र आवश्यक कागदपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
या महिलेची मागणी पतीची सुटका नसून, केवळ मुलीच्या भवितव्यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड मिळावे, एवढीच आहे. मुलीचे शिक्षण कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावे, अशी तिची अपेक्षा आहे.
या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*