Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या ज्योती सेंट्रल स्कूलला आंतरशालेय स्पर्धेत प्रथम स्थान!*

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या ज्योती सेंट्रल स्कूलला आंतरशालेय स्पर्धेत प्रथम स्थान!

के. एल. ई. सोसायटीचे राजा लखमगौड़ा प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स, (आर.एल.एस), कॉलेज रोड, बेळगावी येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या "साइंटिया वेनारी - ६.०" या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनी आणि टॅलेंट हंटमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या आंतरशालेय स्पर्धेत बेळगावमधील एकूण ४४ शाळांनी सहभाग नोंदवला होता. ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाट्य स्पर्धेमध्ये (स्किट) भाग घेत, आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रथम स्थान पटकावले.'ड्रग्स शिवाय जीवन सुंदर आहे' या सामाजिक आणि महत्त्वाच्या विषयावर शाळेच्या चमूने अत्यंत प्रभावी स्किट सादर केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांना केवळ प्रभावितच केले नाही, तर त्यांना जनजागृतीचा संदेशही दिला आणि म्हणूनच या स्किटला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शालेय एस.एम.सी. कमिटीचे चेअरमन आणि ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर.के. पाटील सर, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर.एस. पाटील, सेक्रेटरी नितीन घोरपडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.
यावेळी, मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाविश्वातील पुढील वाटचालीसाठी आणि आगामी स्पर्धांमध्येही असेच उत्तुंग यश मिळवण्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*