जायन्ट्स क्लब ऑफ बेळगाव सखीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याची परंपरासुद्धा जायन्ट्स सखीने जपली आहे. याच उपक्रमांतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 5 शिक्षिकांची 'आदर्श शिक्षिका' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
1)सौ. नीता केदारी गुंजीकर, कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प
2) सौ.भाग्यश्री मोहनदास पाटील, वनिता विद्यालय मराठी हायस्कुल,
3)सौ. विद्या जनार्दन नरुटे,
उच्च प्राथमिक शाळा कुंभार्डा, ता. खानापूर
4)सौ. लता रावसाहेब नगरे, चित्रकला शिक्षिका,
मराठी विद्यानिकेत
5)सौ.नीता लाड, हेरवाडकर हायस्कुल
यांची ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता निर्माण करणे, पाठ्यपुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व प्रयोगांच्या माध्यमातून समजावणे, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व देत शिक्षण आनंददायी व कृतीशील करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, प्रश्न विचारण्याची सवय लावणे आणि दैनंदिन जीवनातील घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.या कार्याची दखल घेत बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी शांतीनगर येथे आयोजित कार्यक्रमात ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी डॉ.राजश्री पाटील, डॉ.अर्पिथा, जायन्ट्स सखीच्या अध्यक्षा सौ. सुलक्षणा शिनोळकर,इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
