बेळगाव ता, 8. टिळकवाडी येथील सरकारी शाळा क्रमांक पाच च्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात संत मीरा व मुलींच्या गटात संगमित्रा शाळेने विजेतेपद पटकाविले.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात ठळकवाडी शाळेने पंडित नेहरू शाळेचा 26- 24 असा पराभव केला, तर दुसऱ्या उपात्य सामन्यात संत मीरा शाळेने सरकारी शाळा क्रमांक पाचचा 20-9 असा पराभव केला.
अंतिम लढतीत संत मीरा शाळेने ठळकवाडी शाळेचा 26 -24 अशा गुणप्रकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संघमित्रा शाळेने बालिका आदर्श शाळेचा 28 -9 असा पराभव करीत मुलींच्या गटातील विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश सिंगद,स्पर्धा सचिव एम आर आमोशी, गणेश कमार व्ही ए वाशपण्णावर, के डी कुलकर्णी, आर पी वटगुडी,
सुनिता जाधव शिवकुमार सुंकद आकाश लाड बापू देसाई जयसिंग धनाजी उमेश मजुकर,विश्वनाथ कंगराळकर निरंजन कार्लेकर या मान्यवरांच्या हस्ते विजेता उपविजेता संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
