LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्न

बेळगाव : कडोली गावातील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासकामातील स्लॅब पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ₹10 लाखांच्या विशेष निधीतून मंदिराचे विकासकाम सुरू असून, या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या स्लॅब पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या विकासकामासाठी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, तसेच डीसीसी बँक व अपेक्स बँकेचे संचालक आणि कर्नाटक प्रादेशिक युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मंदिराच्या स्लॅबचे पूजन केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधीपूर्वक करण्यात आले. कार्यक्रमाला मंदिर पंचकमिटीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील धार्मिक व सामाजिक विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत मंदिराचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*