Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*उसदरासाठी शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश! सरकारकडून प्रती टन ₹३३०० दर जाहीर*

कर्नाटकात उसदराच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने उसाचा दर प्रती टन ₹३३०० इतका निश्चित केल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) बेंगळुरू येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दर जाहीर होताच बेळगाव जिल्ह्यातील गुर्लापूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात ठिय्या आंदोलन छेडले होते. दरम्यान, दोन मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो निष्फळ ठरला. अखेर शुक्रवारी सायंकाळपर्यंत उसदराविषयी निर्णय घ्यावा अशी अंतिम मुदत शेतकऱ्यांनी दिली होती.

सरकारकडून दर घोषित झाल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, तर ऊस कारखानदारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*