Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Politics News

*अपघातात जखमी झालेल्या शांताताईंची प्रकृतीची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली विचारपूस*


बेळगाव :
बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना बेक्किनकेरी गावचे नेते नारायण बेळगांवकर यांच्या पत्नी श्रीमती शांता या दुचाकी अपघातात जखमी झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.


नारायण बेळगांवकर हे आपल्या पत्नी शांता यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत शांता यांना दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.


जखमी शांता यांच्याशी आस्थेने संवाद साधत हेब्बाळकर यांनी त्यांना धीर दिला. कोणतीही चिंता करण्याची गरज नसून, लवकरात लवकर त्या पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसेच कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली.


तसेच पुढील उपचार व वैद्यकीय तपासणीची आवश्यकता लक्षात घेऊन, आपल्या निकटवर्तीय सहाय्यकांना त्यांच्यासोबत पाठवून शांता यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

 डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक तातडीचे उपचार आणि योग्य वैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


जनतेच्या अडचणीच्या काळात तातडीने मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, शांता या लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.
यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच कुटुंबीय उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव विशेष वार्तांकन शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘मॉन्टी फाउंडेशन’चा निर्धार!* *मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देणे गरजेचे : अविनाश भोसले**महादान २०२६’ अंतर्गत रक्तदानासह अवयवदान, नेत्रदान व देहदान जनजागृती अभियान विनायक नगर येथे २० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन**सायबर सुरक्षेचा धडा! मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य**22 वी खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी; कर्नाटक-महाराष्ट्रात सुमारे 15 ठिकाणी झडती*देवन बामणेची विश्वविजयाकडे झेप!श्री गणेश फेस्टिव्हलचा आज सांगता सोहळा; बेळगावातील नवरत्नांचा होणार गौरव*अपघातात जखमी झालेल्या शांताताईंची प्रकृतीची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली विचारपूस**नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट; बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी**बेळगाव शहरासाठी १५० BSNL 4G टॉवर्सची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन*