दुबई:
यूएई च्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयसीसी वुमन्स t20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यांमध्ये न्यूझीलंड महिला टीमने दक्षिण आफ्रिका महिला टीमचा 32 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले.
रविवार 20 ऑक्टोबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. न्यूझीलंडने मर्यादित 20 षटकांमध्ये पाच बाद 158 धावा केल्या. यामध्ये कर्णधार सुजी सुजणे 32, अमे अमेली हिने 43 तर ब्रुकी हिने 38 धावांचे योगदान दिले. 159 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 126 धावा करू शकला.
दक्षिण आफ्रिकेतर्फे कर्णधार लॉरा हिने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने मर्यादित 20 षटकांमध्ये नऊ बाद 126 धावा केल्यामुळे न्युझीलँड ने 32 धावांनी वर्ल्ड कप जिंकला.
नियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा याआधी बांगलादेशमध्ये होणार होती . तेथील वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे ही स्पर्धा यूएई येथे घेण्यात आली.