बेंगलोर (श्रीधर पाटील)येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारतावर आठ गड्यांनी विजय मिळविला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने आघाडी घेतली आहे. 36 वर्षांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट टीमने टीम इंडियाचा भारतामध्ये कसोटी सामन्यांमध्ये पराभव केला होता. त्यानंतर आता म्हणजेच 2024 यावर्षी भारताचा भारताच्या भूमीमध्ये न्यूझीलंडने पराभव केला आहे. याचा अर्थ म्हणजेच 1988 यावर्षी न्यूझीलंड क्रिकेट टीमने टीम इंडियाचा भारतामध्ये कसोटी सामन्यात पराभव केला होता.
दरम्यान या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव फक्त 46 धावात गुंडाळला गेला होता. न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या होत्या. त्यामध्ये रचीन रवींद्रच्या 134 धावांचा आणि कॉनवेच्या 90 धावांचा समावेश होता. त्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात भारतावर 356 धावांची आघाडी घेतली होती.
दुसऱ्या इनिंगमध्ये भारतातर्फे दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ने 52 , यशस्वी जयस्वालने 35, विराट कोहलीने 70, पंतने 99 आणि सरफराज खान यांनी दीडशे धावांचे योगदान दिले होते. पण तळाच्या फलंदाजांनी विशेष काही केले नाही . त्यामुळे भारताचा दुसरा डाव 462 धावावर गुंडाळण्यात आला होता.
त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे टारगेट मिळाले होते. 107 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड टीमची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराह याने न्यूझीलंडला पहिला धक्का शून्य धावसंख्येवर दिला. त्यानंतर बुमरानेच्या 35 धावसंख्येवर न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यानंतर रवींद्र आणि विल यंग यांनी 107 धावांचे लक्ष आरामात पार केले .