श्री मत् आद्य शंकराचार्य जयंती उत्सव २०२५
श्री चिदंबर देवस्थान, चिदंबर नगर येथे, ता.२८ -४- २०२५ पासून २-५-२०२५ पर्यंत ,श्री मत् आद्य जगद्गुरु शंकराचार्य जयंती उत्सव साजरा करण्यात येईल.रोज सकाळी रुद्राभिषेक व महापूजा आणि सायंकाळी ६.३० ते ७.३० प्रा.संजीव कुलकर्णी यांचे श्री मत् आद्य शंकराचार्य तत्वज्ञानावर प्रवचने होणार आहेत.
ता २-५-२०२५ रोजी सकाळी लघु रुद्राभिषेक, महापूजा, श्री मल्हारी होम, आरती, मंत्रपुष्पांजली, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.सद्भक्तांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रा.श्री चंद्रशेखर शास्त्री यांनी आवाहन केले आहे.
श्री चिदंबर देवस्थान येथे, शाळा विद्यार्थांसाठी, रविवार ता.२७-४-२०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री मत् आद्य शंकराचार्य कृत स्तोत्र वाचन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धक कोणतेही एक स्तोत्र वाचन करु शकतो.