बेळगांव:येणाऱ्या शनिवार 12 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या दसरा उत्सव सीमाउल्लंघन कार्यक्रमासाठी पूर्व तयारी म्हणून अधिकारी व मध्यवर्ती महामंडळ व देवस्थान मंडळीच्या वतीने सीमाउल्लंघनाच्या मैदानावरती पाहणी करण्यात आली व तिथं सर्व रीतीने समस्या दूर करून येणाऱ्या उत्सवाचे जयत तयारी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यंदाच्या वर्षी एक वेगळ्या पद्धतीने चेंगराचेंगरी न होता उत्सव व्यवस्थित नियोजित रित्या करण्याचा निर्धार मागच्या बैठकीत करण्यात आला होता.तसाच आज प्रत्यक्षात मैदानावरती रूपरेषा ठरवण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील,रमाकांत कोंडुसकर ,मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर व जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,देवस्थानचे पंच मंडळचे रणजीत चव्हाण पाटील, दलीत नेते मल्लेश चौगुले, चव्हाट गल्ली देवस्थानचे श्रीनाथ पवार निशांत कुदे,अनंत बामणे,रोहन जाधव,मातंगी देवस्थानचे बुद्रुक पुजारी,पिंटू कुरणे यांच्यासहित महानगरपालिकेचे अधिकारी,हेस्कॉम विभागाचे अधिकारी वनविभागचे अधिकारी उपस्थित होते.