मुंबई:येथील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरी कसोटी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 65.4 षटकांमध्ये 235 धावा केल्या. भारतातर्फे रवींद्र जडेजा याने पाच तर वॉशिंग्टन सुंदर याने चार बळी घेतले. शुक्रवारी खेळ थांबला तेव्हा भारताने चार बाद 86 धावा केल्या होत्या. भारत अजूनही 149 धावांनी पिछाडीवर आहे. भारताच्या अजूनही सहा विकेट शिल्लक आहेत.
शुक्रवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तिसरी आणि अंतिम कसोटी भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू झाली. येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अनुकूल असल्याने न्युझीलँडच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. पण संघाच्या 15 धावा झाल्या असताना त्यांची पहिली विकेट पडली. त्यामुळे त्यांनी आणखीनच सावध खेळ केला. त्यामुळे दुसऱ्या विकेटसाठी त्यांच्याकडून 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. टॉम आणि विल यंग यांनी डाव सावरला. त्यानंतर 59 धावा झाल्या असताना त्यांच्या दुसऱ्या विकेटचे पतन झाले. तेरा धावाची भर पडल्यानंतर 72 धावा झाल्या असताना त्यांची तिसरी विकेट गेली. त्यानंतर मात्र चौथ्या विकेटसाठी सर्वात महत्त्वपूर्ण 87 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक विकेट पडत गेली आणि न्यूझीलंडचा डाव अवघ्या 235 धावांत गुंडाळला गेला. भारतातर्फे रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने पाच बळी घेतले. वाशिंग्टन सुंदर याने चार विकेट तर आकाशदीपने एक विकेट घेतली.
भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर 25 धावा लागल्या असताना कर्णधार रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाला आकार दिला. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. खराब फटका मारण्याच्या नादात यशस्वी जयस्वाल 30 धावांवर बाद होऊन तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीमध्ये चार खणखणीत चौकार हाणले. त्यानंतर विराट कोहली च्या पाठीमागे अपयश धावून आले तो चार धावावर धावचित होऊन तंबूत परतला.
खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल 31 धावांवर आणि ऋषभ एक धावांवर नाबाद खेळत होते. न्युझ न्यूझीलंडतर्फे एजाज पटेल ने दोन आणि मॅट याने एक विकेट घेतली. खेळ थांबला तेव्हा भारताने चार बाद 86 धावा केल्या होत्या. शुक्रवारचा दिवस दोन्ही संघांसाठी संमिश्र ठरला. शनिवारी भारताने सावध फलंदाजी करून मोठी आव्हानात्मक धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी नाबाद असलेल्या ऋषभ पंत आणि शुभमन यांनी जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे.