भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान दुसरी कसोटी पुणे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 24 ऑक्टोंबर पासून खेळण्यात येणार आहे. बेंगलोर येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करून मालिकेमध्ये एक विरुद्ध शून्य अशी आघाडी घेतली आहे.
गुरुवार 24 ऑक्टोबर पासून दुसरी कसोटी पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत एक / एक अशी बरोबरी करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
तसेच न्यूझीलंड टीम मालिकेत दोन विरुद्ध शून्य अशी आघाडी घेऊन कसोटी मालिका जिंकण्याच्या हेतूनेच खेळणार आहे. पहिल्या कसोटी मध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठरलेल्या के एल राहुलला दुसऱ्या कसोटीमध्ये स्थान मिळणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. जखमी असल्यामुळे पहिल्या कसोटीमध्ये शुभमन गिल खेळू शकला नव्हता. आता त्याला दुसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळणार असल्याचे समजते.
जर असे झाले तर के एल राहुल किंवा आणखीन कोणत्यातरी एका फलंदाजाला बाहेर बसावे लागेल. त्याचबरोबर पहिल्या कसोटीमध्ये आर अश्विन फलंदाजी, गोलंदाजी या दोन्हीमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर देखील बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.
न्यूझीलंडने 36 वर्षानंतर भारतात येऊन भारतावर कसोटी विजय मिळविला आहे त्यामुळे भारताने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी मध्ये भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेत आहेत. तसेच दुसरा कसोटी सामना जिंकून डब्लूटीसी च्या पॉइंट टेबल मध्ये आपले स्थान आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न टीम इंडिया नक्की करणार आहे.
तितक्याच जोमाने न्युझीलँड टीम कसोटी मध्ये दुसरा विजय नोंदवून मालिका जिंकण्याचा जोरदार प्रयत्न करणार आहे. एकूणच टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी करून न्यूझीलंडला मालिका विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर असे झाल्यास भारतीय टीम तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडला पराभूत करून मालिका जिंकण्याचा जोरदार प्रयत्न करेल.
रणजी ट्रॉफी मध्ये अष्टपैलू कामगिरी केलेल्या सुंदर वॉशिंग्टन याची निवड समितीने न्युझीलँड विरुद्ध होणाऱ्या पुणे येथील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड केली आहे त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रातील ताकद पुन्हा वाढले आहे. याचा फटका न्यूझीलंड टीमला निश्चित जाणवेल अशी आशा बीसीसीआय करत आहेत.