This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Sports

*विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट*

*विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट*

बेळगाव ता,09. कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 ते 2 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल

संघाने विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला.प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा दक्षिण मध्यक्षेत्रने पूर्व पश्चिमक्षेत्राचा 1–0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.विजयी संघाच्या निधीशा दळवीने एकमेव गोल केला.

माध्यमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतील संत मीरा दक्षिणमध्येक्षेत्रने पूर्वक्षेत्र पंजाबचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या दीपिका रियांगने एकमेव गोल केला्. वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या जम्मू कश्मीर व महाराष्ट्र येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

वरील फुटबॉल खेळाडूंचे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, गटशिक्षणअधिकारी रवी बजंत्री, एस पी दासपणावर, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, अशोक शिंत्रे जाहिदा पटेल, साधना बद्री, प्रकाश पाटील ,उमेश कुलकर्णी, आर पी वंटगुडी डॉ नवीन शेट्टीगार, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचे अभिनंदन व सत्कार तसेच आगामी होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच संघाला गणवेश दिल्याबद्दल ओमकार देसाई याचे अभिनंदन करण्यात आले. या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील शिवकुमार सुतार चंद्रकांत तुर्केवाडी शामल दड्डीकर प्रेमा मेलीनमनी यांचे मार्गदर्शन लाभत आहे विजेत्या प्राथमिक 14 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार निधीशा दळवी उपकरणदार समीक्षा खन्नूरकर, श्रेया लाटुकर, हर्षदा जाधव, समृद्धी कोकाटे, धनश्री जमखंडीकर, राधा धबाले, कल्याणी हलगेकर, अनन्या रायबागकर, सिंचना तिगडी, हर्षिता गवळी, समृद्धी घोरपडे, सृष्टी सातेरी, आदिती सुरतेकर, अद्विता दळवी, कनिष्का हिरेमठ कृतिका हिरेमठ, तर माध्यमिक 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार चैत्रा इमोजी उपकप्तान दीपा बिडी , अंजली चौगुले ,ऐश्वर्या शहापूरमठ, चरण्या एम , भावना कौजलगी सृष्टी बोंगाळे, किर्तीका लोहार, दीपिका रेंग मोनिता रेंग अमृता मलशोय, सान्वी पाटील, संस्कृती भंडारी, जिया बाचीकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24