पर्थ:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गावस्कर बॉर्डर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी येथे खेळण्यात आली. या कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी दणदणीत पराभव करून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळेच नाद नाही करायचा! ही बूम बूम बुमराह ची टीम आहे याचा चांगलाच अनुभव ऑस्ट्रेलियाला आला आहे.
या कसोटी मध्ये भारताचे क्षेत्रक्षण , गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली झाली. टीम इंडियाने विशेष करून दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीत विशेष कमाल करत कमबॅक केले. भारताने दुसऱ्या डावात सहा बाद 487 धावांवर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा 238 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी मोठा विजय मिळविला. सामन्यामध्ये एकूण आठ विकेट घेणाऱ्या भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराला सामनावीर पुरस्कार मिळाला.
फलंदाजी मध्ये के.एल. राहूल , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली यांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजी मध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शिराज यांनी चांगले प्रदर्शन केले. एकंदरीत भारताच्या सांघिक प्रयत्नामुळेच हा मोठा विजय प्राप्त झाला. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया मधील हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. या विजयामुळे भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्थान आणखीन मजबूत झाले आहे.