बेळगाव:जिजामाता महिला मंडळ व आयोध्या तालीम टिळकवाडी यांच्यावतीने नवरात्री उत्सव काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. दांडिया ,गरबा या पद्धतीची विविध कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात. हे कार्यक्रम भरवण्याचा उद्देश एकच की आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे.आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या हिंदू संस्कृती बद्दल माहिती असावी. विविध मान्यवरांचाही सन्मान केला जातो.
बेळगावचे उपमहापौर अनंत चव्हाण यांच्या हस्ते दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून गरबा व दांडिया कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
त्याचप्रमाणे मंगळवारी रात्री बेळगावचे उपमहापौर व वार्ड क्रमांक ४४ चे नगरसेवक श्री आनंद चव्हाण यांचा जिजामाता महिला मंडळ व आयोध्या तालीम टिळकवाडी यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा उपाध्यक्ष व सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.