बेळगांव:श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरमध्ये आज कार्तिक अमावस्या निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आलेला होता. सकाळपासूनच मंदिर मध्ये विशेष धार्मिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये विशेष लोणी पूजा व सायंकाळी मंदिर ट्रस्ट व सर्व महिला सेवेकरांच्या वतीने महाआरती करून दिपोत्सवला सुरुवात झाली.
मंदिर परिसरामध्ये आकर्षक रांगोळी व दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर तसेच कपिलेश्वर मंदिराच्या बाजूला गणपती विसर्जन तलावावर विशेष रांगोळी तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई व आतिषबाजी करून हा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
मंदिराच्या हॉल मध्ये 12 ज्योतिर्लिंग सहित शिवशंकर शंभूचा संपूर्ण परिवार रांगोळीच्या स्वरूपात रेखाटण्यात आला होता.यामध्ये रांगोळी कलाकारांचा देखील मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला ही आकर्षक अशी रांगोळी सात्विक अनिगोल,दिव्या कंग्राळकर,शिवनंदन पाटील,भावीका नौखंडकर,श्रेया कुलकर्णी,स्वाती चन्नेवाडकर,स्वाती कणबरकर
रेवती पाटील,निलेश पाटील आणि विशेष परिश्रम घेतले.