कोनवाळ गल्ली श्रीमंत गणेश मंदिराचा ३० वा वर्धापन साजरा
बेळगाव: कोनवाळ गल्ली येथील श्रीमंत गणेश मंदिराचा 30 वा. वर्धापन दिन रविवार दि. १६/२/२०२५ रोजी पार पडला. वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सहस्त्र मोदक हवन,महाअभिषेक, पूर्णाहुती , उत्सवमूर्ती महापूजा पार पडली.
या निमित्ताने सायंकाळी सातेरी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम,तसेच रात्री वाजता महाआरती
करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला