सरफराज खान , ऋषभ पंत यांची फटकेबाजी
बेंगलोर:( श्रीधर पाटील)
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिली कसोटी सुरू आहे. ही कसोटी अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा भारताने सर्व बाद 462 धावा केल्या होत्या. यामध्ये भारतातर्फे सरफराज खान याने तडाखेबाज दीडशे धावा तर रिषभ पंत याने 99 धावांची दमदार खेळी केली. पण भारताचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताचा डाव 462 धावात गुंडाळण्यात आला. भारताने पहिल्या डावात सर्व बाद 46 आणि दुसऱ्या डावात 462 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या होत्या.त्यामुळे न्युझीलँडला आता विजयासाठी फक्त 107 धावांची गरज आहे. त्यामुळे न्यूझीलंडला विजयाची संधी जास्त आहे. रविवारी भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजी करून न्यूझीलंडचे फलंदाज झटपट बाद केले तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकतो चित्र वेगळे दिसू शकते.
पहिल्या डावामध्ये भारताचा डाव पत्त्याच्या पानाप्रमाणे कोसळला होता. दुसऱ्या डावामध्ये मात्र भारताच्या पहिल्या पाच फलंदाजाने सर्वोत्तम कामगिरी करत धावसंख्येला आकार दिला होता. तळाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे भारताचा दुसरा डाव 462 धावावर गुंडाळण्यात आला होता. एकवेळ भारताची स्थिती 5 बाद 438 अशी होती पण त्यानंतर सर्व बाद 462 अशी झाली. तळाच्या फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. त्यामुळे आता पाचव्या दिवशी न्युझीलडला विजयाची संधी मिळाली आहे. मात्र भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजी केली तर सामन्यांमध्ये चित्र वेगळे दिसू शकते.हा सामना भारत सुद्धा जिंकू शकेल किंवा अनिर्णित सुद्धा राहू शकेल.
अनलकी ऋषभ पंत
या कसोटीमध्ये खेळाच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंत ने शानदार खेळी केली. पण तो शतक करू शकला नाही. केवळ एका धावेने त्याचे शतक हुकले. 90 ते 100 दरम्यान आल्यानंतर सातव्यांदा ऋषभ 2018 यावर्षी दोन वेळा वेस्ट इंडिज विरुद्ध, 2021 यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध, 2022 यावर्षी श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध आणि आता 2024 रोजी न्यूझीलंड विरुद्ध त्याचे शतक शंभरच्या जवळ आल्यानंतर हुकले आहे. त्यामुळे या खेळीचे तो शतकामध्ये रूपांतर करण्यात अनलकी ठरला आहे.
————-