बेळगाव : दुचाकी अपघातात आजी जागीच ठार झाली, तर नातू जखमी झाल्याची घटना नुकतीच बैलहोंगल तालुक्यातील नयागरजवळ घडली. गंगम्मा कुलकर्णी (वय ७५, रा. बुदिहाळ,ता. बैलहोंगल) असे मृत वृद्धेचे नाव आहे, नातू गंगाधर आजीचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जात होता.
यावेळी म्हैस आडवी आल्याने दोघेही दुचाकीवरुन पडले. यामध्ये आजीच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन ती जागीच ठार झाली. नातू जखमी झाला असून त्याच्यावर बैलहोंगल सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.