एकशे सहा वर्षाची परंपरा असलेल्या बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत साक्षात शिवसृष्टी अवतरलेली पाहायला मिळाली.
नरगुंदकर भावे चौकात मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन केल्यावर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत हरीनामाचा गजर करत भजनी मंडळ सहभागी झाले होते.https://dmedia24.com/historical-films-on-behalf-of-art-film-production/
झाँज पथक, लेझीम पथक, ढोल ताशा तसेच बँड देखील मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. शहरातील विविध शिवजयंती मंडळाचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते.शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग जिवंत देखाव्यातून चित्रराथावर सादर करण्यात आले. मिरवणुकीत मर्दानी पथकांनी देखील आपली कला सादर करून मने जिंकली. देखावे पाहण्यासाठी शिवप्रेमीनी गर्दी केली होती.