जीवनविद्येचे आदर्श – छत्रपती शिवाजी महाराज, व्याख्यानाचे आयोजन
सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन,शाखा बेळगाव,उपकेंद्र वडगाव यांच्या वतीने श्री वामनराव पै यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून या खास व्याख्यानाचे आयोजन केले आहे. पाचगणी महाबळेश्वर येथील नामवंत व्याख्याते श्री भरत पांगारे हे मार्गदर्शन करणार असून यामध्ये जीवनविद्येच्या दृष्टीकोणातून आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध पैलू उलघडून दाखवणार आहेत.सद्याच्या युवा पिढीला शिवाजी महाराजांचे स्वभाव दर्शन,त्यांचा त्याग व असामान्य कर्तृत्व,त्यांचे समाजभान यांची जाणीव होऊन युवा पिढीला स्वतः प्रति, कुटुंब, समाज व राष्ट्रा प्रति कर्तव्याची जाणीव व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
वडगाव उपकेंद्राचा दहावा वर्धापन दिन व नामधारक कै.चांगदेव देसाई यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम असून सदर कार्यक्रम शनिवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सायं. ठीक 5.30 ते 8.30 या वेळेत श्री. मंगाईदेवी देवस्थान, पाटील गल्ली, वडगाव येथे संपन्न होणार आहे. हरिपाठ, संगीत जीवनविद्या व मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सदर कार्यक्रम विनामूल्य असून समस्त बेळगावकरांनी खास करून युवा वर्गाने मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.