This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local News

*प्रशासनाने फलक झाकल्याने निर्माण झाला वाद*

*प्रशासनाने फलक झाकल्याने निर्माण झाला वाद*
D Media 24

बेळगाव: उद्या होणाऱ्या धर्मवीर संभाजी उद्यान येथे नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने आयोजित वक्त बोर्ड हटाव देश बचाव या कार्यक्रमाचे फलक संपूर्ण शहरभर लावण्यात आले असून आज काही ठिकाणी पोलीस कडून या फलकावर कागद लावून झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रशासनाचा निषेध म्हणून गोवावेस सर्कल येथे बजरंग दल आणि हिंदू संघटनांनी एकत्र येऊन रास्ता रोको करून आंदोलन छेडले.

प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. काही काळ गोवावेस सर्कल येथे रास्ता रोको केल्याने नागरिकांना वाहतूक अडथळा निर्माण झाला.तसेच उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान यावेळी बजरंग दल व हिंदू संघटनांनी केले.

याप्रसंगी कृष्णा भट्ट बोलताना म्हणाले की हिंदू वरती अनेक अन्याय होत आहेत. बोर्डच्या नावावर नोटीस देऊन अनेक हिंदू लोकांच्या जागा बळकविण्याचे काम मुस्लिम करत आहेत.आणि त्याला प्रशासन संपूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि आज आम्ही जनजागृती करिता वक्त बोर्ड हटाव देश बचाव असा कार्यक्रम करत असताना त्या बोर्डवर पेपर लावून झाकण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहे असे त्यांनी सांगितले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.