तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना
बेळगाव:सांबरा विमानतळ कंपाउंड जवळ एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.मारीहाळ पोलीस स्टेशनच्या होनिहाल व माविनकट्टी गावा जवळील विमानतळ कंपाउंड जवळ एका शेतामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला असून तरुणाच्या खिशामध्ये दुचाकीची चावी सापडली आहे. तरुणाच्या डोक्यामध्ये दगडाने वार करून त्याची हत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही.
सकाळी शेतामध्ये शेतकऱ्यांना मृतदेह पाहून घाबरले आणि त्यांनी तात्काळ माळ मारुती पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन पंचनामा केला. पोलिसांनी काही काळ माविनाकट्टी रस्त्यावर वाहने जाऊ दिले नाहीत.तसेच पोलीस प्रशासन या घटनेची अधिक तपासणी करत आहे.