मनपा आयुक्तांनी केली पिंक टॉयलेटची पाहणी
मनपा आयुक्तांनी महिलांसाठी असलेल्या पिंक टॉयलेटला बोरवेल आणि पाईपलाईन द्वारे पाण्याची सोय करण्यात यावी करिता पिंक टॉयलेटची पाहणी केली.
येथील झेंडा चौक मार्केट येथे महीलांकरिता पिंक टॉयलेट बसविण्यात आले आहे या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणी संदर्भात मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्यानुसार महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि मनपा कायदा सल्लागार एडवोकेट महंत शेट्टी यांनी मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विलास कलगटगी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी भेट घेतली.
यावेळी आयुक्तांची झालेल्या चर्चेत विकास कलघटगी यांनी शहराच्या मुख्य बाजारपेठेत महिलांकरिता असलेले पिंक टॉयलेट मध्ये पाण्याची सोय नसल्याने महिलांची गैरसोय होत असल्याची माहिती दिली त्यामुळे या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात यावी आणि या ठिकाणी एखादे बोरवेल व्हावे असे सांगितले.
यावेळी आयुक्तांनी तात्काळ पिंक टॉयलेट साठी पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना केली यावेळी मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाचे अजित सिद्धनावर रतन हनमशेठ गिरीश बागी यांच्यासह व्यापारी बंधू उपस्थित होते.