This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मनपा आयुक्तांनी केली पिंक टॉयलेटची पाहणी*

*मनपा आयुक्तांनी केली पिंक टॉयलेटची पाहणी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनपा आयुक्तांनी केली पिंक टॉयलेटची पाहणी

मनपा आयुक्तांनी महिलांसाठी असलेल्या पिंक टॉयलेटला  बोरवेल आणि पाईपलाईन द्वारे पाण्याची सोय करण्यात यावी करिता पिंक टॉयलेटची पाहणी केली.

येथील झेंडा चौक मार्केट येथे महीलांकरिता पिंक टॉयलेट बसविण्यात आले आहे या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणी संदर्भात मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

त्यानुसार महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि मनपा कायदा सल्लागार एडवोकेट महंत शेट्टी यांनी मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विलास कलगटगी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी भेट घेतली.

यावेळी आयुक्तांची झालेल्या चर्चेत विकास कलघटगी यांनी शहराच्या मुख्य बाजारपेठेत महिलांकरिता असलेले पिंक टॉयलेट मध्ये पाण्याची सोय नसल्याने महिलांची गैरसोय होत असल्याची माहिती दिली त्यामुळे या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात यावी आणि या ठिकाणी एखादे बोरवेल व्हावे असे सांगितले.

यावेळी आयुक्तांनी तात्काळ पिंक टॉयलेट साठी पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना केली यावेळी मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाचे अजित सिद्धनावर रतन हनमशेठ गिरीश बागी यांच्यासह व्यापारी बंधू उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24