बेळगाव: दिवाळीच्या पाडव्याच्या सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली त्यामध्ये आई आणि मुलांनी पाण्यात झोकून आत्महत्या केली.
हिंडलगा जवळी विनायक मंदिर शेजारी असलेल्या अरगण तलावामध्ये आई आणि मुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली कविता बसवंत जुने बेळगावकर राहणार कलखांब, समर्थ बसवंत जुने बेळगावकर अशी मृत आई मुलाची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प येथील अरगण तलावात दोन मृतदेह तरंगत होते यावेळी मिलिटरी प्रशासनाने याची माहिती कॅम्प पोलीसना दिली. पोलिसांनी येऊन एच ई आर एफ फेसबुक फ्रेंड सर्कल या संघटनेच्या माध्यमातून तरंगत असलेले मृतदेह तलावा बाहेर काढण्यात आले.
मृतदेह सोबत मिळालेल्या चिट्टी मध्ये लिहिलं होतं. नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केले व सासू सासरे यांनी त्रास दिल्यामुळे मुलगा आणि मी आत्महत्या करत असल्याचे त्याची मध्ये लिहिलं होतं. याच कारणामुळे आई मुलाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
एच इ आर एफ व फेसबुक फ्रेंड संघटनेचे बसवराज हिरेमठ,संतोष दरेकर,अवधूत तुडयेकर यांनी प्रयत्न करून पाण्यात तरंगत असलेले मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. आई व मुलाने तीन दिवसापूर्वी तलावामध्ये उडी घेतली असावी आणि तीन दिवसानंतर मृतदेह पाण्यात तरंगल्यामुळे ही घटना उघडकीस आली.