रविवारी माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यत
बेळगाव:
धर्मराज गल्ली, शर्यत मंडळ येल्लूर यांच्यावतीने रविवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता खास दीपावलीनिमित्त एका माणसाने 50 किलो वाळूचे पोते घालून लाकडी बैलगाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
धर्मराज गल्ली , शर्यत कमिटी , परमेश्वर नगर येळूर यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे ठिकाण धर्मराज गल्ली, येल्लूर येथे आहे. बैलगाडी ओढण्यासाठी स्पर्धकाला एक मिनिटाचा वेळ आहे. स्पर्धेसाठी 501/- रुपये प्रवेश शुल्क आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक परशराम कंगराळकर राहणार आहेत. दीपप्रज्वलन ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील , ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी कणबरकर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर रमेश धामणेकर, परशराम धामणेकर, प्राथमिक कृषी पतीन सोसायटीचे व्हाईस चेअरमन विष्णू मासेकर, ब्रह्मलिंग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पावले यांच्या हस्ते होणार आहेआहे. शर्यतीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश परशराम गोरल आणि अभिषेक अरुण पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
त्याचबरोबर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दुधाप्पा बागेवाडी, परशराम व्यं.पाटील, रणजीत स. गोरल , कृष्णा ज. बिजगरकर ,विनोद स. पाटील, शशिकांत सो. धुळजी आदी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक- मेंढा, द्वितीय बक्षीस रुपये 5555/-, तृतीय बक्षीस, 4501/- चौथे बक्षीस 3501/-, पाचवे बक्षीस 3001/- , सहावे बक्षीस 2501/- , सातवे बक्षीस 2001/- , आठवे बक्षीस 1501/- , नववे बक्षीस 1201/- , दहावे बक्षीस 1101/- , अकरावे बक्षीस 1001/- हौशी स्पर्धकांनी शर्यतीचा लाभ घ्यावा ,असे आवाहन धर्मराज गल्ली , शर्यत मंडळ येल्लूर, बेळगाव यांनी केले आहे. भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा-
7795594295 , 8123818824 , 8861475021 , 8861943083 असे स्पर्धा संयोजकांनी कळविले आहे.