बेळगाव : डिजिटल न्यूज असोसिएशनच्या सदस्यांनी आमदार अभय पाटील यांची भेट घेऊन सभासदांना हेल्थ कार्ड सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.नुकत्याच झालेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, जिथे आ अभय पाटील यांच्या सहकार्याने ही सुविधा यशस्वीपणे राबवण्यात आली.
आमदार अभय पाटील यांनी डिजिटल पत्रकारांसाठी आरोग्य कार्ड योजना सुलभ करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे डिजिटल मीडिया काम करणाऱ्याना आवश्यक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.त्याबद्दल असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी डिजिटल न्यूज असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर गौंडी, प्रवक्ता इकबाल जकाती, सेक्रेटरी कृष्णा शिंदे,कार्य समिती प्रमुख महादेव पवार,समन्वयक दीपक सुतार, सदस्य राजेश पेटकर, अमृत बिर्जे उपस्थित होते.