सोमवारपासून शाळांना प्रारंभ
बेळगाव:
राज्यातील सर्व शाळांना 3 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत दसरोत्सवानिमित्त सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी आता संपली असून सोमवार 21 ऑक्टोंबर पासून चालू वर्षाच्या शालेय शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून प्रारंभ होत आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना 21 पासून शाळेमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुट्टीमध्ये देण्यात आलेला गृहपाठ शालेय अभ्यास पूर्ण करून येण्याचे आवाहन केले आहे. सोमवारपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याकडे सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्ष देण्यास प्रयत्न केला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये नक्कीच वाढ होणार असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा कला , क्रीडा, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास करण्यावर सर्व शाळांनी भर दिल्याचे दिसत आहे. एकूणच विद्यार्थ्यांवर ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार करण्याचे महान कार्य सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग करत आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असल्याचेही दिसून येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेमधून पौष्टिक, सकस आहार देण्यात येत आहे.