बेळगाव बेल्लद कायदा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष व्याख्यान
बेळगाव : केएलई संस्थेचे बी.व्ही.बेल्लद कायदा महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी जेएनएमसी,केएलई संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विश्वास यादवाड यांचे विशेष व्याख्यान झाले.यावेळी बोलताना त्यांनी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच मानसिक आरोग्य बळकट करण्याचे मार्गही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका ज्योती हिरेमठ, सहाय्यक प्राध्यापक संतोष पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.