बेळगांव: बुधवारी उत्तरचे आमदार आसिफ राजू शेठ यांनी शहरातील मध्यवर्ती स्थानकाची पाहणी व स्थानिक प्रवासी,ऑटो रिक्षा चालक यांना उद्भवणाऱ्या वाहतुकीच्या समस्या बद्दल जाणून घेण्याकरिता भेट दिली. या भेटीचा उद्देश एकच प्रवाशांच्या समस्या सोडवणे आणि बस स्थानकाची कार्यक्षमता वाढवणे.
भेटी दरम्यान सेठ यांनी ऑटो रिक्षा युनियनच्या प्रतिनिधीशी गर्दी व अपुऱ्या सुविधा आणि प्रवासी व चालक व दोघांच्या सुरक्षेतेच्या समस्या वर चर्चा केली. यावे ऑटो रिक्षा युनियनच्या सदस्यांनी योग्य पायाभूत सुविधा व स्थानिक अधिकाऱ्यांकडून सुरळीत कामकाज व सुनिश्चित करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली.
आमदारांनी त्यांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकल्या आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण काम करू असे आश्वासन दिले.त्यांनी समुदायाच्या कल्याणासाठी आणि आर्थिक विकासासाठी विश्वसनीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या महत्त्वावर भर दिला.
आमदारांचा सक्रिय सहभाग बेळगाव उत्तरेतील वाहतूक सेवा सुधारण्यासाठी त्यांची बांधिलकी दर्शवितो. या भेटीनंतर, आवश्यक बदल अंमलात आणण्यासाठी आणि मध्यवर्ती बस स्थानकाच्या सर्व वापरकर्त्यांसाठी अनुभव वाढवण्यासाठी संबंधित एजन्सीसोबत सहयोग करण्याची त्यांची योजना आहे.