बेळगांव: आज बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ यांनी उत्तर भागातील विद्यार्थी वस्तीगृहनां भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेची पाहणी केली.
श्री देवराज अरस विद्यार्थी वस्तीगृह रामतीर्थ नगर, डॉ.बी.आर.आंबेडकर सरकारी विद्यार्थी वस्तीगृह रामतीर्थ नगर,अल्पसंख्याक कल्याण विभाग बेळगांव विद्यार्थी वस्तीगृह न्यू अल्पसंख्याक कल्याण विभाग विद्यार्थी वस्तीगृह, एस.टी विद्यार्थी वस्तीगृह रामतीर्थ नगर या विद्यार्थी वस्तीगृहाची आमदार राजू शेठ यांनी अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी.
याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तेचे जीवन द्यावे तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही याकडे जातीने लक्ष देण्याचे आदेश यावेळी आमदारांनी दिले.