कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी आर टी ओ चेक पोस्टवर लोकायुक्त पथकाने धाड टाकली.
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी आर टी ओ चेक पोस्टवर वाहन चालकांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार अनेक वाहन मालक आणि चालकांनी लोकायुक्तकडे केली होती.
त्याची दखल घेऊन लोकायुक्त एस पी हणमंत राय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आर टी ओ चेक पोस्टवर धाड टाकली.पथकात पंधरा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.लोकायुक्त पथकाची धाड पडताच चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.लोकायुक्त पथकाने चेक पोस्टम धील कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. धाड पडताच तेथील परिसरात असणाऱ्या एजंटांनी देखील पोबारा केला.