राशी भविष्य
मेष :- ता. १७ पासून कन्येचा सूर्य शुभयोगात येईल. कुंभेचा शनी लाभस्थानी अनुकूल आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. स्वप्ने साकार | होतील. नवीन ओळखी होतील. प्रसंगावधान दाखवाल, कर्तृत्त्वाने इतरांची मने जिंकाल. अधिकार प्राप्तीचे योग येतील. मनींचा संभ्रम दूर होईल. अर्थप्राप्ती होईल. आरोग्यात सोधारणा
वृषभ :- बुध-शुक्र थोडी फार मदत करतील. श्रध्दा व सबुरी ठेवावी लागेल, इतरांना दिलेला शब्द पाळाल. पत प्रतिष्ठा वाढीस लागेल. नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. धार्मिक मंगल कार्यात भाग घ्याल. राहत्या घराविषयीचे प्रश्न सुटतील. आपला स्वभाव महत्वकांक्षी राहील. आरोग्याची साथ मिळेल.
मिथुन :- महत्वाची कामे पूर्वार्धात करून घ्या सिंहेचा सूर्य अनुकूल आहे. कामे यशस्वी होतील. मेषेचा गुरू घनस्थानी आहे. अर्थप्राप्ती चांगली झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. आनंदवार्ता समजतील. मनांवरचा ताण दूर होईल. संयमाने वागाल. कर्केचा शुक्रही शुभयोगात आहे. आरोग्यात सुधारणा होईल.
कर्क :- ता.१७ पासून कन्येचा सूर्य पराक्रमी स्थानी शुभयोगात होईल. कर्तव्य पूर्तीचे समाधान मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची संधी प्राप्त होईल. प्रिय घटना घडतील. तुमची कृती इतरांना प्रेरणा देईल. वेळेचा छान उपयोग कराल. स्पर्धा जिंकाल.
सिंह :- मेषेचा गुरू भाग्यस्थानी विराजमान आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील. कर्केचा शुक्रही अनुकूल आहे. देवाची मर्जी राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. परंतु पुढे फायदा होईल. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक कराल. शरीरस्वास्थ चांगले राहील.
कन्या :- शुक्र शनि शनुकूल आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. सुसंवाद साधुन कामे करण्यावर भर द्याल. अधिकारांचा योग्य उपयोग कराल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास हेही दिवस चांगले जातील. कार्यक्षमता वाढवावी लागेल. परिणामांचा विचार करून कृती करावी. आरोग्य ठीक राहील.
तूळ :- महत्वाची कामे पुर्वार्धात करा यशस्वी होतील. सिंहेचा सूर्य धनस्थानी शुभयोगात आहे. मेषेचा गुरू सप्तमस्थानी अनुकूल आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. आनंदवार्ता समजतील. कौटुंबिक प्रश्न सुटतील. शरिरस्वास्थ व मनःस्वास्थ्य चांगले राहील. यशस्वी व्हाल…
वृश्चिक :- सूर्य, मंगळ, बुध व शुक्र शुभयोगात आहेत. मनावरचा ताणतणाव दूर होईल. अंतिम विजय तुमचाच असेल. वेळेचा व संधींचा योग्य उपयोग करून घ्याल. सामंजस्य दाखवून कामे कराल. हितसंबंध सुधारतील. महिलांना गृहव्यवस्थापनेत छान यश मिळेल. आनंदवार्ता समजतील.
धनुः– ता. १७ पासून कन्येचा सूर्य मदत करील. व्यवहारातील कोडी उलगडतील. दुकानदारी, दलाली, शेअर्स खरेदी विक्री यात फायदा होईल. अर्थप्राप्ती होईल, परंतु र्खाही वाढेल. परंतु तो योग्य कारणांसाठी होईल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कामात उत्साह राहील. दिवस चांगले जातील.
मकर:- मेहनतीवरच भर द्यावा लागेल. ग्रहमानाची मदत मिळणार नाही. संयम सावधानता आणि सहनशीलता ठेवावी लागेल. स्वावलंबी व्हाल. कलासाधनेत आनंद प्राप्त होईल. कामात वाढ होईल. त्याचा आरोग्यावर ताण पडेल मनःस्वास्थ्य जपावे लागेल. व्यवहारी राहून बचतीकडे लक्ष द्यावे.
कुंभ :- महत्वाची कामे ता १७ पर्यंत करून घ्या. ती यशस्वी होतील. इतर ग्रहमान अनुकूल नाही. प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. परिणामांचा विचार करून कृती करावी संयमाने वागावे. संघर्ष टाळवे हिताचे होईल. प्रवासात वेळेचे व मौल्यवान वस्तूंचे | भान ठेवावे. आरोग्यास जपावे.
मीन:- ग्रहमान उत्तम आहे. सूर्य, बुध, गुरू आणि शुक्र तुमची स्वप्ने साकार करतील. प्रगती साठी नवीन संधी प्राप्त होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल. आवडत्या छंदासाठी अधिक वेळ देऊ शकाल. इतरांशी हितसंबंध सुधारतील.