राकसकोप जलाशयात इतकेच पाणी शिल्लक
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी हिडकल आणि राकसकोप जलाशयातील पाणी साठ्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे त्यामुळे शहराला आता फक्त दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी राकसकोप जलाशयात शिल्लक आहे.
राकसकोप आणि हेलकट जलाशयातील पाण्याची पातळी खालावली असल्याने शहरात आठ ते दहा दिवसात एकदा पाणीपुरवठा केला जात आहे मात्र आता चले आशयाची पातळी आणखीनच खालावल्याने तसेच राकसकोप मध्ये सात फुटापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आता शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे
जलाशयात कमी पाणी साठा असल्याने आता शहरात पंधरा दिवसात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो म्हणजे महिन्यातून फक्त दोन तास शहरांमध्ये पाणीपुरवठा केला जाऊ शकतो.
राकसकोप जलाशयामध्ये काल 6.5 इतका पाणी साठा होता. तर हिडकल जलाशयामध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे अजून तरी बेळगाव उत्तर विभागांमध्ये पाणीटंचाईची समस्या भासणार नाही मात्र गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जलाशयातील पाणीसाठा देखील कमी झाले असल्याने आता नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे